•Thane Tadipar News आरोपीला 2 वर्षासाठी ठाणे जिल्ह्यासह 3 जिल्हातुन केले होते हद्दपार
ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. ठाण्यामध्ये राजन विचारविरुद्ध नरेश मस्के शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना राहणार असून पोलिसांनी यंदाची निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे. 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांकडून खबरदारी म्हणून शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुणांचे धरपकड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याकरिता शहरातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तडीपार आरोपींना अटक करण्याचे निर्देश ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहे. विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. चितळसर पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला मानपाडा परिसरातून अटक केली आहे. आरोपीकडे बेकायदेशीर तलवार बाळगत होता.
आरोपी चंदन मनोज गुप्ता (22 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 ठाणे, जिल्हासह मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पालघर या हद्दीतुन 2 वर्षाच्या कालावधीकरिता कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 26 सप्टेंबर 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 ठाणे यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 16 मे रोजी पहाटे 5.30वा. चे सुमारास, चितळसर पोलिसा ठाण्याच्या पथकास मिळुन आला आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, 37(1),135, भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी चंदन गुप्ता याला मानपाडा परिसरातून अटक केली असून आरोपीकडे बेकायदेशीर रित्या एक तलवार पोलिसांना सापडले आहे. या पुण्याला तपास पोलिसा हवालदार कलगुटकर हे पुढील कारवाई करत आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…