Thane Tadipar News : तडीपार आरोपी अटक, मनाई आदेश भंग करून तलवार घेऊन शहरात वावर
Thane Tadipar News : उल्हासनगर पोलीस ठाणे Ullhasnagar Police Station यांची कारवाई ; पाच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या आरोपीला अटक
उल्हासनगर :- पुढील दोन दिवस राज्यात मोठ्या राजकीय हालचाली होणार असून त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी म्हणून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्त असलेल्या व्यक्तींना अटक करण्यास सुरुवात केली आहे. याबाबतच्या निर्देश ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी दिले आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यातून Ullhasnagar Police Station दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या एका आरोपीला मोकाट शहरांमध्ये तलवारी फिरवून गुन्हेगार करण्याच्या प्रवृत्तत असताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या आरोपीवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Tadipar News
आरोपीला अटक
आरोपी हंशु बिपीन झा, (22 वर्ष), रा.उल्हासनगर-02 यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांनी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, व रायगड जिल्हयाचे महसुल हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश 9 मार्च 2024 अन्वये दिले होते. परंतू सदर आरोपी याने त्यास महसुली जिल्हयामध्ये मा.पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-04 उल्हासनगर यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना देखील सदर मनाई आदेशाचे उल्लंघन करून, 1 जुन 2024 रोजी 3.30 वा.चे सुमारास, उल्हासनगर येथे 01 लोखंडी तलवार बेकायदेशीररित्या जवळ बाळगला असताना उल्हासनगर पोलीस ठाणे चे पथकास मिळून आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी हंशु बिपीन झा, (22 वर्ष) यास अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पऱ्हाड हे करीत आहेत. Thane Tadipar News
Web Title : Thane Tadipar News : Tadipar accused arrested, defying restraining order and walking around town with sword