Thane Tadipar News : मनाई आदेश भंग, तडीपार आरोपीला अटक
Thane Tadipar News Kalwa Police Take Action Against Tadipar Person : कळवा पोलिसांची कारवाई, आरोपीला दोन वर्षाकरिता पाच जिल्ह्यात प्रवेश बंदी होती
ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे.तसेच राज्याच्या राजकारणातील आणि शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. ठाणेनगर पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला कळवाच्या गोपाळनगर कळवा पुर्व परिसरातून अटक केली आहे. Thane Tadipar News
आरोपी अजित ऊर्फ पहिल्या मारुती सुंडके (32 वर्ष) याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 यांनी ठाणे, मुंबई शहर,मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यातून 29 जानेवारी 2024 रोजी दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. परंतु आरोपी अफसर 3 एप्रिल कोणाचीही परवानगी न घेता कळवा पुर्व च्या गोपाळनगर प येथे असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी अजित याला अटक केली आहे. कळवा ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अफसर याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पी.एम.जाधव हे करत आहे. Thane Tadipar News