Thane Tadipar News : मनाई आदेश भंग, गणप्या आरोपीला अटक
•तडीपार गणप्याला पोलिसांनी केले जेरबंद, दोन वर्षाच्या कालावधी करिता केले होते हद्दपार
ठाणे :- मनाई आदेश भंग करणाऱ्या आरोपीला अटक केल्याची घटना ठाण्यासमोर आली आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपी अटक करण्याचे निर्देश दिले होते. तडीपार गणप्याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.
आरोपी सुमित चंद्रकांत पवार ऊर्फ गणप्या, (28 वर्ष), (रा.गांधीनगर, वागळे इस्टेट,) ठाणे यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5, वागळे इस्टेट यांनी ठाणे, बृहन्मुंबई व नवी मुंबई या जिल्हयांचे महसुली हद्दीतुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश 02 फेब्रुवारी अन्वये दिले होते. परंतू सदर आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये मा.पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5, वागळे इस्टेट यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 29 मे रोजी 5.30 वा. चे सुमारास, पंच समतानगर कॉर्नर, वागळे इस्टेट, ठाणे येथे वागळे इस्टेट पोलीस ठाणेचे पथकास मिळुन आला. प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी सुमित चंद्रकांत पवार ऊर्फ गणप्या, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार राणे हे करीत आहेत.