ठाणे
Trending

Thane Share Market Scam : शेअर मार्केटच्या नावाखाली 46 लाखांची फसवणूक

•Thane Share Market Scam News शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुकीची संख्यामध्ये दिवसेंदिवस वाढ, अधिकचे नफा मिळण्याचे अमिष देऊन लाखोंचा गंडा

ठाणे :- यंदाच्या वर्षात लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारीचा आलेख वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस शेअर मार्केटच्या नावाखाली बँक खाते ठगी करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे मोठे नेटवर्क असल्याचे दिसून येत आहे. Trendy and Current : Beware of Share Market Fraud in the Digital Age ठाण्याच्या कासारवडवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेची शेअर मार्केटच्या नावाखाली 46 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेला गुंतवणुकीवर अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवडवली परिसरात राहणाऱ्या एका 46 वर्षाच्या महिलेची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे. साधारणतः व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करून एक लिंक पाठवली. त्या लिंक द्वारे प्रोफाइल बनवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेने विश्वास ठेवून आणि अधिक नफा मिळेल या अमिषाला बळी पडत जवळपास 46 लाख 69 हजार रुपयाची ऑनलाइन गुंतवणूक केली होती. सायबर गुन्हेगारांनी त्या महिलेला ती रक्कम विविध बँकेच्या खात्यावर ऑनलाईन भरण्यास सांगितले होते. ऑनलाइन गुंतवणुकीचे पैशावर कोणत्याही प्रकारे मोबदला न मिळाल्याने तसेच गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (क),66 (ड),34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0