Thane Latest Share Market Fraud News: SBI-INT हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून 9.70 लाखांची फसवणूक, कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ठाणे :- शेअर मार्केट, शेअर ट्रेडिंग, शेअर्स खरेदी-विक्री, आयपीओ याच्यामधून त्वरित पैसे कमवा, अधिकचा परतावा, सर्वाधिक नफ्याचे आमिष यांसारख्या शब्दापासुन सावधान रहा.. Share Market Fraud Trend कारण शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. Thane Latest Share Market Fraud News ठाण्याच्या चितळसर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 9.70 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये फिर्यादी याला SBI-INT मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून आर्थिक फसवणूक झाली आहे. आरोपीच्या विरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Thane Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम विजयकुमार गुप्ता (39 वर्ष, रा. चितळसर मानपाडा ठाणे) येथे राहणाऱ्या व्यक्तीला महिला आणि इतर व्यक्तींनी कॉल करून शेअर ट्रेडिंग बाबत बेसिक ट्रेनिंग दिले होते. त्यानंतर व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करून SBI-INT ॲप डाऊनलोड करण्याकरिता लिंक पाठवली. ॲप डाऊनलोड केल्यानंतर फिर्यादी गुप्ता यांनी शेअर मार्केट करिता 9.70 लाख रुपयाची आर्थिक गुंतवणूक केली तसेच आरोपीच्या बँक खात्यावर ऑनलाईन ही रक्कम भरण्यास भाग पाडून ते रक्कम पर्यंत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात. गुप्ता यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) सह भारतीय न्याय संहिता 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बोलण्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक करत आहे. Thane Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…