Thane Latest Sex Racket News : तीन असहाय्य महिलांची सुटका; दलाल महिलांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
ठाणे,उल्हासनगर :- शहराच्या मध्यवर्ती परिसरात वेश्याव्यवसाय चालवून महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दोन महिला दलालांना गुन्हे शाखेने रंगेहात अटक केली आहे. हंसधाम को.ऑ. हौसिंग सोसायटी, कृष्णनगर, उल्हासनगर-4 या ठिकाणी काही पिडीत महिलांना फुस लावून देहविक्रीसाठी तयार केलं जात असल्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुप्त सापळा रचून ही कारवाई केली. Thane Latest Sex Racket News
या कारवाईत दोन्ही महिला दलालांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिलांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 मधील कलम 143(1), 143(3), 3(5) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मधील कलम 3,4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सर्जिकल कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी केले असून, त्यांच्या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, क्षिरसागर, कदम, वालगुडे, तसेच कर्मचारी व्ही.आर. पाटील, सुवारे, किशोर पाटील, खरात आणि पोलीस शिपाई पाटील यांचा मोलाचा सहभाग होता.ही कारवाई म्हणजे शहरातील बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांवर पोलिसांनी घातलेला धडाका मानली जात असून, यामुळे अशा प्रकारच्या वर्तणुकीला लगाम बसेल, अशी नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटत आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…