Thane Sex Racket News : ‘पबच्या आड देहविक्रीचा गोरखधंदा!’ ठाण्यात दलाल महिलेला अटक; दोन पीडितांची सुटका

Thane Sex Racket Busted पोलिसांच्या सापळ्यात उघड झालं रेस्टॉरंटच्या आड चालणारं अनैतिक व्यवहाराचं रॅकेट,ठाणे गुन्हे शाखेच्या धडक कारवाईने उघड झालेल्या प्रकरणाने खळबळ; अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची सुटका
ठाणे :- कल्याण-शिवडी रोडवरील ‘राधा कृष्णा रेस्टॉरंट अॅण्ड बार’मध्ये महिलांना नोकरीचं आमिष दाखवून देहविक्रीस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने तडाखेबंद कारवाई करत मुख्य दलाल महिलेला अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक अल्पवयीन मुलगीही आहे, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
16 मे रोजी संध्याकाळी गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई केली. ग्राहक बनून गेलेल्या पोलिसाच्या माध्यमातून व्यवहार निश्चित झाल्यावर लगेचच पथकाने धाड टाकली. त्यात आरोपी महिला आणि तिला देहविक्रीसाठी प्रवृत्त केल्या गेलेल्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि ‘पोक्सो’ अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पीडित महिलांना संरक्षणासाठी शांतीसदन, महिलाचे सुधारगृह, उल्हासनगर-5 येथे संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ठाणे पोलीस आयुक्तालयाने महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेली ही कारवाई सामाजिक स्तरावर स्तुत्य ठरते आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे तसेच धनाजी क्षिरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक देवानंद चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रध्दा कदम, पोलीस हवालदार व्ही. आर. पाटील, आर.यु. सुवारे, के. बी. पाटील, महिला पोलीस अंमलदार पी. जी. खरात, एच. आर. थोरात, यु. एम. घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.



