Thane Sex Racket : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश – महिला एजंट अटक, दोन पीडित मुलींची सुटका

ठाणे | 11 ऑक्टोबर 2025 :
ठाणे पोलिसांच्या Thane Police अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने (AHTC) पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलत सेक्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला आहे. Thane Sex Racket या कारवाईत एका महिला एजंटला अटक करण्यात आली असून तिच्या तावडीतून दोन निरपराध मुलींची सुटका करण्यात आली आहे. Thane Police Latest News
ही कारवाई कासारवडवली पोलिस ठाण्याच्या Thane Kasarwadwali Police Station हद्दीत, घोडबंदर रोडवरील आनंदनगर सिग्नलजवळ करण्यात आली. मुंबईतील एका एनजीओकडून मिळालेल्या अचूक माहितीनंतर, AHTC टीमने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि ठाणे शहरात रॅकेटचा भंडाफोड केला. Thane Latest Sex Racket News
तपासात उघड झालं धक्कादायक जाळं!
अटक केलेली महिला एजंट आणि तिची फरार साथीदार मागील काही महिन्यांपासून गोवा, पुणे, गुजरात, ठाणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सेक्स रॅकेट चालवत होत्या.
त्या ग्राहकांना मुलींचे फोटो व्हॉट्सअॅप आणि मोबाइलद्वारे पाठवत असत. ठाणे पोलिसांनी फरार एजंटला या अंतरराज्य रॅकेटची “मास्टरमाइंड” ठरवलं आहे. Thane Police Latest News
कायदेशीर कारवाई सुरू!
क्राइम ब्रँचनं अटक Thane Crime Branch महिला एजंट आणि फरार साथीदाराविरुद्ध भारतीय दंड संहिता व PITA कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुटलेल्या दोन्ही मुलींना सध्या महिला सुधारगृहात सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू आहे.
कारवाईमागचे खरे शिलेदार!
ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे (AHTC, ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली
PSI स्नेहल शिंदे, PSI निलेश क्षीरसागर, PSI वालघुडे,
हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, राजेश सुवारे, किशोर पाटील, विजय नाईक, दिनेश महाले,
चालक विजय निकम, तसेच महिला पोलीस हर्षिता थोरात, पूनम खरात आणि किरण चांदेकर
यांनी संयुक्तपणे केली.
ठाणे पोलिसांची ठाम भूमिका!
महिला आणि मुलींच्या शोषणाला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिस दल सतत कारवाई करत आहे.
“अनैतिक मानवी वाहतूक करणाऱ्यांना ठाण्यात स्थान नाही!” — असा इशारा ठाणे पोलिसांकडून देण्यात आला आहे.


