क्राईम न्यूज

Thane Sex Racket : ठाण्यात देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त!

Thane Sex Racket Busted : पोलिसांचा सापळा — पुरुष दलाल जेरबंद, तीन मुलींची सुटका!

ठाणे, दि. १७ ऑक्टोबर २०२५
ठाणे शहरात देहव्यापाराचा घाणेरडा बाजार उभारणाऱ्या एका पुरुष दलालाचा पर्दाफाश अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांनी केला आहे. Thane Sex Racket
स्वागत हॉटेल, कॅसल मिल नाका या ठिकाणी दलाल असहाय्य मुलींना फुस लावून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची गुप्त माहिती मिळताच,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांच्या पथकाने थेट धाड घालून सापळा रचला आणि आरोपीला रंगेहात पकडले! Thane Latest Crime News

या कारवाईत दलालाच्या तावडीतून तीन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली असून,
राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १४३०/२०२५ भारतीय दंड संहिता कलम १४३(१)(३), ३(५) सह
अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. Thane Breaking News

ही कारवाई डीसीपी अमरसिंह जाधव व एसीपी रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली
वैशाली गोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय धाडसाने पार पाडली. Thane Police Latest News

“महिलांचा सन्मान विकणाऱ्यांना ठाण्यात जागा नाही!”
असा करारा इशारा ठाणे पोलिसांनी या मोहिमेतून पुन्हा एकदा दिला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

31 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago