Thane Sex Racket : ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन पिडीत मुलींची सुटका
Thane Sex Racket Busted News : ठाण्यातील लुईस वाडी परिसरात सोशल मीडियाचा वापर करून देह व्यापार रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला अटक केली.
ठाणे :- ठाणे शहरातील लुईसवाडी परिसरात चालू असलेल्या देह व्यापार रॅकेट चालवल्याच्या Thane Sex Racket News आरोपाखाली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे आणि वेश्याव्यवसायात भाग पाडलेल्या आणखी दोन महिलांची सुटका केली आहे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अनैतिक मानव तस्करी विरोधी पथकाच्या (AHTC) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, ठाणे शहरातील लुईसवाडी सर्विस रोड जवळील शहनाई हॉल, पप्पू दा धाबा, एक महिला ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे शरीर सुखासाठी (सेक्स) मुली पुरवण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या मार्फत पोलिसांनी या परिसरात सापळा रचून एका बोगस ग्राहकाच्या माध्यमातून छापेमारी केली असता या छापेमारीत एक महिला वेश्यादलाल अटक केली आहे. ही महिला ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे मुलींचे फोटो पाठवत असे आणि त्यातून आर्थिक मोबदल्यात मुली पूर्वत असल्याची कबुली वेश्या दलाल महिलेने केली आहे. या महिलेचे नेटवर्क वापी, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई आणि ठाणे शहर येथे ती मुली पुरवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात PITA कायद्यान्वये त्या महिलेला अटक करून दोन पीडित महिलेंची सुटका केली आहे. त्यांना महिला सुधार गृहामध्ये पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस पथक
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, पोलीस उपनिरीक्षक डी व्ही चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, पोलीस हवालदार विजय पाटील, के बी पाटील, महिला पोलीस हर्षिता थोरात, पुनम खरात, चांदेकर या पथकाने या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला आहे.