Thane Sex Racket Busted News : ‘AHTC’ क्राईम ब्रांचची धडक कारवाई; ‘ती’ महिला एजंट दोन वर्षांपासून चालवत होती ऑनलाइन गोरखधंदा
ठाणे :- ठाणे शहरात देहव्यापाराचे जाळे कसे पसरले आहे, याचा पुन्हा एकदा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने (AHTC) मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरातून एका हायप्रोफाईल महिला दलालाला अटक करून तिच्या तावडीतून तीन निष्पाप तरुणींची सुटका केली आहे. ही महिला गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवून देहव्यापाराचा ऑनलाइन गोरखधंदा चालवत होती. Thane Sex Racket Latest News
कसा लागला छडा?
ठाणे शहर AHTC च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मुंब्रा परिसरात सुरू असलेल्या या ‘सेक्स रॅकेट’बद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. एका महिला एजंट मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ ग्राहकांना मुलींचा पुरवठा करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर खबर त्यांच्याकडे होती. माहिती मिळताच, पीआय गोरडे यांनी कोणताही विलंब न लावता एक अत्यंत गुप्त मोहीम आखली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली AHTC च्या पथकाने एक बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला पंचांसोबत मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात पाठवले. जसा व्यवहार ठरला आणि महिला एजंट मुलींना घेऊन पोहोचली, तसाच पोलिसांनी छापा टाकला. अवघ्या काही क्षणांतच पोलिसांनी त्या महिला एजंटला रंगेहाथ पकडले आणि तिच्या तावडीतून तीन पीडित तरुणींना सुखरूप बाहेर काढले.
दोन वर्षांपासून सुरू होता ‘फोटो’चा बाजार
चौकशीत समोर आले आहे की, अटक करण्यात आलेली ही महिला एजंट गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत पद्धतशीरपणे हा देहव्यापाराचा व्यवसाय चालवत होती. ती ग्राहकांना वेगवेगळ्या तरुणींचे फोटो पाठवून ‘डील’ ठरवत असे. या माध्यमातून तिने अनेक तरुणींना या दलदलीत ओढले असल्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेचे पथक आता या महिला एजंटचे आणखी किती साथीदार आहेत आणि तिने किती इतर तरुणींना या दलदलीत ढकलले आहे, याचा कसून तपास करत आहे.
अटक केलेल्या महिला एजंटवर भारतीय न्याय संहिता आणि PITA (Prevention of Illicular Traffic) कायद्याच्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, सुटका करण्यात आलेल्या तीन तरुणींना त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी महिला सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली AHTC च्या पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वालघुडे आणि संपूर्ण टीमने संयुक्तपणे केलेल्या या धडक कारवाईमुळे देहव्यापाराच्या या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…