Thane Police Buster Sex Racket : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांची धडक कारवाई ; दोन पिडीत महिलांची सुटका
ठाणे :- “साई टच रेस्टॉरंट” वागळे इस्टेट राजरोसपणे सुरू असलेल्या अनैतिक शारीरिक संबंध व्यवसायावर धडक कारवाई करून पर्दाफाश केला आहे. Thane Sex Racket दोन पिडीत महिलांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांनी सुटका केली असून एका महिला वेश्यादलाल हिला पोलिसांनी अटक केली आहे. Thane Police Latest Crime News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहराची सांस्कृतिक, धार्मिक वारसा जपणारे, विभूतीचे शहर आहे. असे असताना शहरात अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होते. शहरात अनैतिक शारीरिक व्यवसाय चालतो अशी चर्चा पसरली होती.परंतु, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत “साई टच रेस्टॉरंट” येथे एक महिला दलाल वेश्या व्यवसायासाठी दोन पिडीत आणि असहाय्य महिलांना घेऊन येणार असल्याची बातमी मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी एक पथकाची स्थापना करून मंगळवार (1 एप्रिल) दुपारच्या सुमारास साई टच रेस्टॉरंट, वागळे इस्टेट येथे सापळा रचून एका महिला दलाल तिला अटक केली. तसेच, पोलिसांनी त्या महिला दलाल तिच्या ताब्यातून दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, धनाजी क्षिरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. चव्हाण, एन.डी. क्षिरसागर, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रध्दा कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. वालगुडे, पोलीस हवालदार के. बी. पाटील, व्ही. आर. पाटील, आर. यु. सुवारे, महिला पोलीस अंमलदार पी.जी. खरात, एच. आर. थोरात, पोलीस अंमलदार यु.एम. घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…