Thane Sex Racket Busted By Thane Police : गुगलवर एस्कॉर्ट सर्व्हिसची जाहिरात, ग्राहकांना फोटो पाठवून महिलांची ‘डिलिव्हरी’
ठाणे | “हाय प्रोफाईल एस्कॉर्ट सर्व्हिस” या आमिषाने ऑनलाईन ग्राहकांना फसवून देहविक्री करणाऱ्या रॅकेटचा Thane Sex Racket ठाणे गुन्हे शाखेने Thane Crime Branch पर्दाफाश केला आहे. सायबर प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या या टोळीने गुगलवर जाहिरात देत मोबाईल नंबरद्वारे संपर्क ठेवत महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांची दिशाभूल केली जात होती. Thane Police Latest News
दिनांक 20 जून रोजी, ठाणे शहरातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारवाईचे बेत आखण्यात आले. ऑनलाइन नंबरवर संपर्क साधून एका बनावट ग्राहकामार्फत सापळा रचण्यात आला. आरोपीने ठाण्यातील “हॉटेल शिव वंदना इन लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग”, वंदना सिनेमा कंपाउंड येथे महिला पाठविण्याचे कबूल केल्यावर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच, मुख्य दलालास अटक करण्यात आली असून, हॉटेल मॅनेजर आणि अन्य दोन आरोपी फरार आहेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नुसार भादंवि कलम 143(1), 143(3), 3(5) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, विनय घारेपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. वालगुडे, पोलीस हवालदार व्ही. आर. पाटील, आर.यु. सुवारे, के.बी. पाटील, महिला पोलीस अंमलदार पी.जी. खरात, एच.आर. थोरात, पोलीस अंमलदार शाहु पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…