क्राईम न्यूज

Thane Sex Racket : ठाण्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! – थायलंडची महिला दलाल अटक; दोन पीडित मुलींची सुटका, आरोपी आणि पीडितांचा ‘व्हिसा’ही संपलेला.

Thane Police Busted Sex Racket : कासारवडवली पोलिसांची घोड़बंदर रोडवर धडाकेबाज कारवाई; महिला दलालावर बीएनएस आणि पीटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल.

ठाणे :- ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.Thane Sex Racket कासारवडवली पोलीस ठाण्याच्या Kasarwadwali Police Station पथकाने घोड़बंदर रोड परिसरात छापा टाकून थायलंड देशातील एका महिला दलालाला अटक केली असून, थायलंडच्याच दोन पीडित मुलींची वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून सुरक्षित सुटका केली आहे. Thane Latest Crime News

आज कासारवडवली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांना ठाणे शहराचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनू वर्गीस यांच्याकडून एक गुप्त माहिती मिळाली. घोड़बंदर रोड, आनंद नगर सिग्नल, सूरज बायके हॉटेलजवळ थायलंडची एक महिला दलाल ग्राहकांना थायलंडच्या मुलींचे फोटो पाठवून देहव्यापारासाठी मुली पुरवण्यासाठी येणार असल्याची ती माहिती होती.

माहिती मिळताच कासारवडवली पोलीस स्टेशनच्या टीमने तत्काळ कारवाई करत बनावट ग्राहक पाठवून आनंद नगर सिग्नलजवळ सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळावरून थायलंड देशाच्या महिला दलालाला ताब्यात घेतले आणि दोन थायलंड देशाच्या पीडित मुलींची सुटका केली. पोलीस सध्या अटक केलेल्या महिला दलालाचे आणखी किती साथीदार आहेत आणि किती थायलंडच्या मुली या वेश्याव्यवसायात अडकल्या आहेत, याचा तपास करत आहेत.

या तपासामध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. अटक केलेली महिला दलाल आणि सुटका केलेल्या दोन्ही पीडित मुली, या तिघींच्याही भारतात राहण्याचा व्हिसा (Visa) संपलेला आहे. कासारवडवली पोलिसांनी थायलंडच्या महिला दलालाला अटक करून बीएनएस (BNS) आणि पीटा ॲक्ट च्या संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तसेच, सुटका केलेल्या दोन पीडित मुलींना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठवण्याची कायदेशीर प्रक्रियाही सुरू आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, झोन-5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago