क्राईम न्यूजठाणे
Trending

Thane Sex Racket : हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चक्क थायलंडच्या तरुणी उल्हासनगरमध्ये वेश्याव्यवसायात

Thane Sex Racket Busted News : ठाणे, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचे धडाकेबाज कारवाई, थायलंडच्या 15 तरुणीची वेश्याव्यवसायातून सुटका

ठाणे :- राज्याच्या लहान मोठ्या व्यवसायिकाचे हब असलेल्या उल्हासनगर मध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय फोफावला आहे. परदेशी तरुणींना या व्यवसायात आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शहरातील अनेक भागांत ‘थायलंड’ तयार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी Police सुटका केलेल्या परदेशी तरुणींनी आपल्या देशातील गरिबीमुळे या व्यवसायात आल्याचे पोलिसांना सांगितले आहे.अलिकडच्या काळात उच्चशिक्षित तरुणींसोबतच विदेशी तरुणींचा या व्यवसायातील सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या शोध -2 Investigations of Thane Police Crime Branch-2 सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या पथकाने धडक कारवाई करत उल्हासनगर-3 मधील सेक्शन 17, येथे छापेमारी करत थायलंड तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. Sex Racket Busted in Thane

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंड मधून काही तरुणी पैशाच्या आमिषाला बळी पडत प्रदेशातून भारतात म्हणजेच ठाण्याच्या उल्हासनगर मध्ये वेश्या व्यवसाय करिता आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच उल्हासनगरच्या, हॉटेल सीतारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन 17 उल्हासनगर-3 येथे वेश्या व्यवसाय चालू असल्याचे बातमी खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. Sex Racket Busted in Thane

खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार व पथकाने सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन 17 उल्हासनगर तीन येथे बनावट ग्राहक पाठवून हॉटेलवर छापा टाकला असता पोलिसांना वेश्या व्यवसायासाठी थायलंड येथून काही महिला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी लॉजचे मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग (37 वय) यांच्यासह चार कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व कामगार आणि मॅनेजर हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग हे जे कामगार आहे. तब्बल 15 पीडित तरुणींची पोलिसांनी सुटका केली असून हॉटेलमधील पाच लाख 27 हजार रोख आणि वस्तू पोलिसांनी छापेमारीत जप्त केले आहे. लॉजिंग व बोर्डिंगचे मॅनेजर व तेथे काम करणारे 4 कामगार यांचे विरूध्द् मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 143 (1), 143(3) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4व 5 प्रमाणे आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sex Racket Busted in Thane

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, Thane CP Ashutosh Dumbare डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-2. गुन्हे शाखा, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 1, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, पोलीस हवालदार संजय राठोड, सचिन शिंपी, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, पोलीस शिपाई भगवान हिवरे, तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0