Thane Sex Racket : असहाय्य महिलांना पैशांचे आमीष दाखवून देहव्यापार, दलाल महिलेला अटक
Thane Sex Racket Busted By Thane Police : दोन महिलांची सुटका; ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई
ठाणे :- असहाय्य महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असलेल्या महिला दलाला अटक करून गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दोन महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी सेक्स रॉकेट चालवणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केला आहे. Thane Latest Crime News
किरण अनिलकुमार राजदेव (40 वय,रा. उल्हासनगर, मूळ गाव पश्चिम बंगाल) या अटक करण्यात आलेल्या वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिला दलालाचे नाव असून, स्वतःच्या फायद्यासाठी असहाय्य महिलांना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेणे सुरु केले होते. ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कल्याण अंबरनाथ रोडवर असलेल्या फाल्टन रेस्टॉरंट अँड बार शांतीनगर,उल्हासनगर-3 येथे एक महिला बेकायदेशीर रित्या वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने बोगस गिर्हाईक आणि पंचांसमक्ष पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला यात पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दलाल किरण राजदेव या महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 143 (1),143(3) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Latest Crime News
पोलीस पथक
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, पोलीस उपनिरीक्षक डी व्ही. चव्हाण, श्रेणी एन डी क्षिरसागर, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालगुडे,मोहीते, पोलीस हवालदार के.बी. पाटील, महिला पोलीस अंमलदार खरात, थोरात,चांदेकर, पोलीस शिपाई गणेश आव्हाड यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. Thane Latest Crime News