ठाणे, २२ ऑगस्ट : ठाण्यातील त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्स या संस्थेच्या सोन्याच्या स्किमच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या संतोष सदानंद शेलार (वय ५६) यास जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे यांनी ७ वर्षांचा सश्रम कारावास व दंड ठोठावला आहे. Thane Gold Scam Latest News
प्रकरणाचा तपशील
फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत, आरोपीने त्रिमूर्ती ज्वेलर्सच्या स्किममध्ये १५ महिने दरमहा १,००० रुपये भरल्यास मुद्दलासह व्याज किंवा सोन्याचे दागिने परत मिळतील, असे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी व त्याच्या मुलाकडून एकूण ३०,००० रुपये जमा करून घेतले. मात्र मुदत संपल्यानंतर आरोपीने ना पैसे परत दिले, ना सोन्याचे दागिने.
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०१९ भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३४ सह महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (MPID) Act कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली होती.
न्यायालयाचा निर्णय
सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.टी. पवार यांनी केली. त्यांनी आरोपी संतोष शेलार यास भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व ५ लाखांचा दंड (दंड न भरल्यास २ वर्षे साधा कारावास) तसेच MPID कलम ३ अंतर्गत ६ वर्षांची शिक्षा व १ लाख रुपयांचा दंड (दंड न भरल्यास १ वर्ष कारावास) ठोठावला.
तर इतर दोन आरोपी — दिपक शांताराम गोपाळ व अनिल दिनकर शिंदे — यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
पोलिसांची कामगिरी
तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक एम.एम. विसपुते, सध्याच्या सहा. पोलीस निरीक्षक विद्या पाटील, तसेच आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहरातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांमुळे या प्रकरणात भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करता आले. सरकारी अभियोक्ता अधिवक्ता विवेक कडू यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…