•The end of Sharmila’s degradation अल्पवयीन मुलीवरील विकृत अत्याचार प्रकरणात आरोपीस 10 वर्षांची सक्त मजुरी
ठाणे | तिचं वय फक्त काही वर्षांचं… स्वप्नांच्या वयात तिच्या आयुष्याची चिरफाड करणाऱ्या नराधमास अखेर कायद्याने धडा शिकवला आहे. ठाण्यातील कळवा परिसरात 2023 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी बंड्या दादा उर्फ रूदेश रमेश शिंदे यास ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्त मजुरी व 15 हजारांचा दंड अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी 3 महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
कळवा पोलिसांचा ठोस तपास, न्यायालयाचा ठाम निर्णय — पीडितेला मिळाला न्याय!
ही धक्कादायक घटना घडल्यानंतर कळवा पोलिस ठाण्याने अतिशय तीव्र, वेगवान आणि ठोस तपास करत या घटनेचा न्यायालयीन अंतीम निष्कर्ष लवकरच आणला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ अटक करत आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या 376(2)(j) तसेच पॉक्सो कायद्याच्या 4,6,8 व 12 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. यादव आणि त्यांच्या पथकाने भक्कम व वैज्ञानिक पुरावे सादर करत आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी कमालीचे परिश्रम घेतले. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, निरीक्षक अनिल गायकवाड आणि सरकारी अभियोक्ता व्ही.जी. कडू यांनी अत्यंत प्रभावी भूमिका बजावली.
मंगळवारी (17 जून 2025) न्यायाधीश ए.एस. भागवत यांच्या न्यायालयाने या विकृत कृत्यावर शिक्कामोर्तब करत आरोपीस कठोर शिक्षा सुनावली. या निकालानंतर पीडितेच्या कुटुंबासह संपूर्ण समाजात न्याय मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…