Thane POSCO Case : विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा; ठाण्याच्या पाेक्साे न्यायालयाचा निर्णय
Thane POSCO Case : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील 2014 मध्ये प्रशिक्षणार्थ डॉक्टर महिलेवर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तात्कालीन प्राध्यापक डॉक्टर यांना तीन वर्षाची सत्ता मजुरीची शिक्षा
ठाणे :- 2014 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा Thane Kalwa Hospital Case येथील डॉक्टर शैलेश्वर नटराजन,( वय 63) हे प्राध्यापक व शैल्यचिकीत्सा विभागाचे प्रमुख असताना त्यांनी एम.बी.बी.एस. च्या महिला डॉक्टर प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणार्थी जवळीक साधुन त्यांची लैंगिक सतावणूक करून विनयभंग केला होता. कळवा पोलीस ठाण्यात Kalwa Police Station लैंगिक अत्याचाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध भारतीय दंड संहिता कायदा कलम 354(A),509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी डॉक्टर याला तीन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सुनावणी दरम्यान तात्कालीन तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांनी आरोपी डॉक्टरांविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालय सादर केल्याने पीडित महिलेला न्याय मिळाल्याचे सांगितले आहे. न्यायाधीश मोहिनी ननावरे यांनी दिलेल्या निकालामध्ये आरोपी डॉक्टर शैलेशवर नटराज यास भारतीय दंड संहिता कायदा कलम 354 (A),509 प्रमाणे दोषी ठरवून तीन वर्षाची सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्त्या लीना पेडणेकर, तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोलीस हवालदार डी.एच. जाधव, पोलीस अंमलदार बिन्नर यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले होते.त्यामुळे गुन्हयातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आल्यामुळे उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस दलातचे समाजातील सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.