Thane Naryan Pawar Latest News : ‘बीएसयूपी’ सेलिब्रेशनवरून वाद विकोपाला; नारायण पवारांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार
ठाणे :- राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण Ravindra Chavan विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यात तणाव सुरू असतानाच, आता थेट ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
बीएसयूपी (BSUP) घरांसाठी 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर झाल्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निर्णय झाल्याने शिवसैनिक (शिंदे गट) विविध ठिकाणी सेलिब्रेशन करत होते. काल (20 नोव्हेंबर) पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असेच सेलिब्रेशन सुरू असताना, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी ‘तुम्ही सेलिब्रेशन कसे करता?’ असे विचारत शिवसेना शाखाप्रमुख हरेश महाडीक आणि उपविभागप्रमुख महेश लहाने यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीनंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एनसी (Non-Cognizable Offence) दाखल केली आहे. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेला असून, हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…