दिनांक: 26/09/2025 पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-२, भिवंडी ठाणे पोलिसांना तंत्रज्ञानाची नवी शस्त्रसज्जता प्राप्त झाली आहे. मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिमंडळ-२, भिवंडी येथे फॉरेन्सिक युनिट आणि फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचे लोकार्पण अपर पोलीस आयुक्त (प.प्रा.वि.) विनायक देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले.
अत्याधुनिक सुविधा
फॉरेन्सिक युनिटमध्ये प्रशिक्षित स्टाफ तैनात असून मोबाईल व्हॅनमध्ये गुन्ह्याच्या ठिकाणीच शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरावे गोळा करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री बसविण्यात आली आहे. ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी ही व्हॅन ठाणे पोलिसांच्या तपासशक्तीत जबरदस्त भर घालणार आहे.
शासनाचा उपक्रम
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या प्रकल्पाचे राज्यस्तरीय लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 27/01/2025 रोजी झाले होते.
उपस्थित मान्यवर
या भव्य कार्यक्रमाला पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, विजय मराठे, सहा पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फॉरेन्सिक टीम तसेच अनेक अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्त्व
भिवंडी परिमंडळातील गंभीर गुन्ह्यांची उकल अधिक जलद, अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी ही फॉरेन्सिक युनिट आणि मोबाईल व्हॅन ठाणे पोलिसांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.
नागरिकांचा विश्वास – ठाणे पोलिसांची नवी ओळख!
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…