Thane Police Busted International Drug Racket : 1 किलो 71 ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; दोन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार, राहुल मस्के आणि टीमची आंतरराज्यीय तस्करीवर झडप
ठाणे :- ठाणे शहराला अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात मॅफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. Thane Drug News या कारवाईत पोलिसांनी 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण 2 कोटी 24 लाख 75 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. Thane Police Latest Crime News
पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक आणि पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ही विशेष मोहीम राबवली.
03 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी चरई, नौपाडा, ठाणे येथील एमटीएनएल कार्यालयासमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 1) इम्रान उर्फ बब्बु खिजहार खान (वय 27), 2) वकास अब्दुलरब खान (वय 30), 3) ताकुददीन रफीक खान (वय 30), आणि 4) कमलेश अजय चौहान (वय 23) या मध्य प्रदेशातील चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील 1 किलो 71 ग्रॅम वजनाचा एमडी (Mephedron) आणि तस्करीसाठी वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी इम्रान उर्फ बब्बु खिजहार खान आणि कमलेश अजय चौहान हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मध्य प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यात चोरी, गोवंश हत्या, मारामारीसारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.
सदर कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर पाटील, पोउपनि राजेंद्र निकम, दिपक डुम्मलवाड, तसेच पोहवा अमोल देसाई, हरिष तावडे, अभिजीत मोरे, अजय सपकाळ, शिवाजी रावते, अमोल पवार, संदीप चव्हाण, नंदकिशोर सोनगिरे, अमित सकपाळ, हुसेन तडवी, गिरीष पाटील, चापोना अनुप राक्षे, महिला पोलीस शिपाई शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे, पोलीस शिपाई अबाजी चव्हाण यांनी सहभाग घेतला.
सध्या या अंमली पदार्थाच्या उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठवणुकीत आणखी कोण-कोण सहभागी आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…