क्राईम न्यूज

Thane Crime News : दिवाळीपूर्वी ठाणे पोलिसांकडून नागरिकांना ‘आनंदाची भेट’; 18.70 लाखांचे 73 मोबाईल परत

Thane Police Latest News : कासारवडवली पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी; ‘CEIR’ प्रणालीचा वापर करून ; महाराष्ट्रभरातून शोध चोरी झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांकडून ठाणे पोलिसांचे आभार

ठाणे :- ठाणे शहर पोलीस Thane Police Station आयुक्तालय हद्दीतील नागरिकांचे हरवलेले, चोरी झालेले अथवा गहाळ झालेले मोबाईल परत मिळवून देण्याच्या विशेष मोहिमेत कासारवडवली पोलीस ठाण्याच्या Kasarwadwali Police Station पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पथकाने सुमारे 18 लाख 70 हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे 73 मोबाईल फोन नागरिकांना परत केले आहेत. Thane Police Latest News

मोबाईल शोधण्यासाठी विशेष पथक

आजच्या काळात मोबाईल ही चैनीची वस्तू न राहता गरज बनली आहे. त्यामुळे मोबाईल हरवल्याने होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे शहरात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते.

यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे आणि पोलीस शिपाई कृष्णकांत भगत यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

महाराष्ट्रभर शोधमोहीम

या पथकाने CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून गहाळ झालेले मोबाईल ट्रेस केले. हे मोबाईल ठाणे शहर आयुक्तालय हद्दीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि देशाच्या इतर राज्यांमध्येही वापरले जात असल्याचे आढळून आले. Thane Latest Mobile Robbery Cases

पोलिसांनी मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन हे मोबाईल हस्तगत केले. अशा प्रकारे, सुमारे 18 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 73 मोबाईल जमा करण्यात आले.

सोमवारी (13 ऑक्टोबर 2025 ) हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. अचानक आपला महागडा मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आणि ठाणे शहर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. नागरिकांचे गहाळ/चोरी झालेले मोबाईल परत करण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

vivek

Recent Posts