Thane Police Seized Tobacco ,ठाणे : तंबाखू नियंत्रण विरोधी पथकाची कारवाई, छापेमारी मध्ये बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका व्यक्तीकडून तंबाखू आणि तंबाखूजन्य (गुटखा) पदार्थ जप्त
ठाणे :- राज्यामध्ये गुटखा Gutkha Seized विक्रीवर बंदी असतानाही सर्रास विक्री करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांच्या तंबाखू नियंत्रण पथकाने छापेमारी करून कारवाई केली आहे. राबोडी परिसरातील क्रांतीनगर गल्लीत कारवाई करत लाखो रुपयांचे तंबाखू आणि तंबाखूजन्य (गुटखा) पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे Thane Police Seized Tobacco .तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने जीवघेणे आजार होतात. यामुळे राज्यात विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.पानटपऱ्या व अन्य दुकानदार गुटख्याची विक्री करत आहेत. Thane Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नसुरक्षा व मानके, राबोडी पोलीस ठाणे यांच्या पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरून नाजमिया अपार्टमेंट, रूम नं-1 क्रांतीनगर गल्ली ,राबोडी येथे बेकायदेशीररित्या तंबाखू आणि तंबाखूजन्य (गुटखा) पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापेमारी केली असता, सिग्नेचर, फाईनेक्स्ट पानमसाला, प्रीमियम राजश्री पान मसाला, राजनिवास सुगंधित पानमसाला, राज कोल्हापुरी, बाजीराव सुगंधित पानमसाला, मुसाफिर पान मसाला, प्रीमियम झेड एल जाफरानी जर्दा असा एकूण सहा लाख 41 हजार 660 किंमतीचे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच, विक्री करणारा असिफ जफर शेख (34 वर्ष) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात कलम 123,274,275,3(5) सह अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2),27,26(2),(iv),30(2)(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावंड हे करीत आहे. Thane Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…