क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Naupada Police News : बसमध्ये चढायचा बहाणा… आणि खिसा साफ! ठाण्यात मोबाईल चोरांची टोळी गजाआड

ठाणे | महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप

Thane Robbery News : बसस्टॉप, गर्दीची ठिकाणं आणि प्रवाशांची घाई— याचाच फायदा घेत खिसेकापू पद्धतीने मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीला नौपाडा पोलिसांनी Naupada Police बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत १५ चोरीचे मोबाईल (किंमत सुमारे १.४५ लाख रुपये) जप्त करताना ८ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.
बस चढायचं नाटक… उतरायचं आणि माल घेऊन गायब!
तीन हात नाका परिसरात प्रवासादरम्यान मोबाईल चोरी झाल्याची तक्रार अरविंद आंब्रे यांनी केली होती. तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज खंगाळले आणि धक्कादायक पॅटर्न समोर आला—
बस आली की गर्दीत चढायचं, क्षणात हात साफ करायचा आणि पुन्हा उतरायचं!
हीच युक्ती वापरून प्रवाशांचे मोबाईल लंपास होत होते.
गोपनीय बातमी आणि सापळा— टोळी जाळ्यात
गोपनीय माहितीनुसार चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एलबीएस मार्ग, नौपाडा येथे येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचला.
पोलिसांची चाहूल लागताच पळ काढणाऱ्या दोघांना काही अंतरावर पाठलाग करून पकडण्यात आलं. Thane Latest Crime News

अटक आरोपी :

सागीर अहमद मो. शब्बीर सिध्दीकी (३५) – शिवाजीनगर, गोवंडी
इजहार अबरार बेग (३८) – सायन, मुंबई
त्यांच्या ताब्यातून १५ चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

८ गुन्हे उघड, जुन्या पापांची यादी लांबलचक
तपासात या टोळीने नौपाडा पोलीस ठाण्यातील ८ मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं.
विशेष म्हणजे इजहार बेग याचा गुन्हेगारी इतिहास थरारक— मुंबई व उपनगरांतील १० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे आधीच दाखल!

नौपाडा पोलिसांची धडक

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि मंगेश भांगे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0