Thane Police News : आर्थिक फायद्यासाठी पोलिसांकडून नियमाचे उल्लंघन, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ!
ठाणे :- ठाणे पोलीस दलातून Thane Police Latest News एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बेकायदेशीरपणे सीडीआरआणि एसडीआर काढून अनधिकृतरित्या जास्त किंमतीवर विकणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ठाणे पोलीस दलातील सायबर विभागात काम करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून हे कृत्य केले जात होते. आर्थिक फायद्यासाठी पोलिसांनी कर्तव्याचा गैरवापर करत मोबाईल डाटा चोरून एका खाजगी व्यक्तीला विक्री करत असल्याची पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. संपूर्ण प्रकाराचा पोलीस गुन्हे शाखा कक्ष-1, ठाणे यांनी शोध घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली होती की,सायबर पोलीस ठाणे,ठाणे शहर येथे नेमणूक असलेले पोलीस शिपाई आकाश सोपान सुर्वे आणि पोलीस शिपाई हर्षद लक्ष्मण परब या दोन पोलीस अंमलदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कर्तव्याचा गैरवापर करून मोबाईल फोन क्रमांकाचा डाटा सीडीआर चोरून तो संपूर्ण डाटा सराईत गुन्हेगार असलेल्या मोहम्मद सोहेल राजपूत याला विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस शिपाई आकाश सुर्वे आणि हर्षद परब या दोघांनाही सेवेतून ‘बडतर्फ’ करण्यात आले आहे.
गैरप्रकार बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे प्रकाश वारके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(4),314,316(5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 46,66,72 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-1 ठाणे, करत आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिन्ही आरोपींना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…