ठाणेमुंबई

Thane Police News : ठाण्यात ‘ट्रॅफिक कार्निव्हल’चा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष मोहिमेचे उद्घाटन

Thane Police News : पुढच्या पिढीला रस्ते सुरक्षेचे धडे; शालेय विद्यार्थ्यांचे कल्पक प्रकल्प आणि ईव्ही प्रदर्शनाने वेधले लक्ष; मद्यपी वाहनचालकांविरुद्ध ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

ठाणे l रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्रॅफिक कार्निव्हल’ या विशेष उपक्रमाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम शहरवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. Thane Police Latest News

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून रस्ते सुरक्षा या कार्निव्हलमध्ये ठाण्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षेवर आधारित चित्रे आणि विज्ञानावर आधारित प्रोजेक्ट्स सादर केले. विशेषतः ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ (मद्यपान करून वाहन चालवणे) सारख्या घटनांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा आळा घालता येईल, याचे प्रभावी सादरीकरण मुलांनी आपल्या प्रकल्पांमधून केले. “पुढच्या पिढीपर्यंत वाहतुकीचे नियम पोहोचवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे,” असे गौरवोद्गार यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी काढले.

मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांचा ‘वॉच’ कार्यक्रमादरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरातील कारवाईचा अहवाल सादर केला. गेल्या वर्षभरात ठाण्यात तब्बल 10 हजार मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातील 3,500 चालकांचे पोलिसांनी केवळ दंड न आकारता समुपदेशनही केले आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांवर सामाजिक मर्यादा यायला हवी.

पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांचा (EV) वापर वाढवा, या उद्देशाने कार्निव्हलमध्ये ईव्ही वाहनांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई-बाईक, सायकल आणि इलेक्ट्रिक चारचाकी चालवून या वाहनांच्या वापराचा प्रसार केला.

मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मनपा आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0