Thane Police Latest News : 11 शाळांत परिसंवाद, सोशल मीडियावर मोहिम, जनतेत 10 हजार पत्रकांचं वितरण; युवकांमध्ये निर्माण झाला नवा जागर
ठाणे | 26 जून – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन. या दिवसाचं औचित्य साधून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण आयुक्तालय कार्यक्षेत्रात दणक्यात जनजागृती अभियान राबवण्यात आलं. विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं, हा दिवस ठाणे पोलीस दलानं केवळ साजरा नाही तर ‘स्मरणात राहील असा जागर’ केला. Thane Police Latest News
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे यांच्यातर्फे 11 शाळा-महाविद्यालयांत परिसंवाद आयोजित करण्यात आले, ज्यात 3000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. पुढील दोन-तीन दिवसांत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमधील शाळांतही अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.
नशेच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्याच्या उद्देशाने, 10,000 जनजागृती पत्रकांचे वाटप रेल्वे स्टेशन, बस स्थानक, रिक्षा स्टँड आणि शैक्षणिक परिसरांमध्ये करण्यात आले. त्याचबरोबर, डिजिटल युगाचा आधार घेत सोशल मीडियावर जनजागृती व्हिडिओ आणि टेम्प्लेट्स फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर व्हायरल करण्यात आले.
शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका ते सेंट जॉन हायस्कूलदरम्यान भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. सुमारे 200 विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
पोलीस कारवाईचा आकडेवारीनिशी ठसा उमटवताना, 2024 मध्ये 3911 गुन्ह्यांतून 4076 आरोपींना अटक करण्यात आली, तर एकट्या 2055 मध्ये आतापर्यंत 1029 आरोपी अटकेत आहेत. या दोन्ही वर्षांत मिळून 27 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गांजा, चरस, एम.डी., कोकेन, ब्राऊन शुगर, कफ सिरप अशा अनेक घातक पदार्थांचा समावेश आहे.
या संपूर्ण मोहिमेच्या माध्यमातून युवकांमध्ये नशेच्या दुष्परिणामांबाबत सजगता निर्माण झाली असून, ठाणे पोलिसांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ही लढाई अजून संपलेली नसली तरी, ठाणे पोलिसांचा निर्धार मात्र अधिक बळकट झाला आहे – “नशेच्या विरोधात, समाजाच्या सुरक्षेसाठी!”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…