क्राईम न्यूज

Thane Police News : ठाणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 44 लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोन मोठे तस्कर गजाआड

Thane Crime Branch Busted Drug Racket : गुन्हे शाखेच्या पथकाने रचले दोन ठिकाणी यशस्वी सापळे ; कळवा नाका आणि शिळफाटा परिसरातून 42 लाखांहून अधिक किमतीचा मेफेड्रॉन (MD) अंमली पदार्थ हस्तगत

ठाणे :- ठाणे शहरातून अंमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्याच्या दिशेने ठाणे पोलिसांनी एक मोठे पाऊल टाकले आहे. पोलीस आयुक्त महोदयांनी दिलेल्या विशेष आदेशांनुसार, गुन्हे शाखा, ठाणेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत तब्बल 44 लाख 66 हजार किमतीचा मेफेड्रॉन (MD) हा अंमली पदार्थ जप्त केला असून, या प्रकरणी दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. Thane Latest Crime News

डॉ. पंजाबराव उगले (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे) आणि अमरसिंह जाधव (पोलीस उप आयुक्त, गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. रविंद्र दौंडकर (सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल मस्के यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. Thane Police Latest News

दोन ठिकाणी यशस्वी सापळा

पहिली कारवाई:

दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी कळवा नाका, ठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचला. या सापळ्यात इरफान नुरमोहमद शेख (वय 47) या आरोपीस पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून 203.2 ग्रॅम वजनाचा, अंदाजे 40 लाख 64 हजार किंमतीचा ‘मेफेड्रॉन (एमडी)’ अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या आरोपीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

दुसरी कारवाई

दुसऱ्या एका कारवाईत (3 ऑक्टोंबर 2025) रोजी शिळफाटा, ठाणे येथे सापळा रचून मोहमद इरफान मोहमद हानिफ शेख (वय 25) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 20.1 ग्रॅम वजनाचा, अंदाजे 4 लाख 2 हजार किमतीचा ‘मेफेड्रॉन (एमडी)’ जप्त करण्यात आला. या आरोपीविरुद्ध शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Drug Racket Busted News

विक्री साखळीचा तपास सुरू

पोलीस आता या दोन्ही आरोपींकडून जप्त केलेला अंमली पदार्थ कोठून आणला आणि तो कोणास विक्री करणार होते, याबाबत सखोल तपास करत आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहरातील ड्रग्जची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनि सोमनाथ कर्णवर पाटील आणि पोउपनि दिपक दुम्मलवाड करत आहेत. Thane Crime Branch Latest News

ठाणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थ विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्यांची कोणतीही माहिती असल्यास तत्काळ अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे कळवावी. Thane Police Latest News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago