Thane Police All Out Operation : ठाणे पोलिसांनी रविवारी रात्री ऑलआऊट मोहीम राबविली होती. या मोहीमेत पोलिसांनी 185 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.
ठाणे :- ठाणे पोलिसांनी Thane Police रविवारी रात्री ऑलआऊट Thane Police All Out Operation मोहीम राबविली होती. या मोहीमेत पोलिसांनी 185 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी तसेच सण उत्सवांच्या कालावधीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी रविवारी रात्री 11 ते सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ऑलआऊट मोहीम राबविली होती. त्यानुसार ठाणे आयुक्तालय क्षेत्रात स्थानिक पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखा आणि वाहतुक पोलिसांचे 312 अधिकारी 1288 कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. Thane Police Latest Crime News
ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान शस्त्र अधिनियम अंतर्गत 31 गावठी कट्टे, 7 कोयते व 5 तलवारी असे एकुण 43 हत्यारे हस्तगत करून एकुण 41 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. अवैध दारूचे एकुण 57 गुन्हे दाखल करून रु.5 लाख 7 हजार 484 ची अवैध दारू जप्त करून एकुण 185 आरोपींवर कारवाई करण्यात आली.
तंबाखूजन्य पदार्थाच्या अनुषंगाने कोटपा कायदयान्वये 179 जणांवर कारवाई करण्यात आली.
सदर ऑपरेशन दरम्यान 74 हॉटेल, 64 लॉज, 39 बियर बार, 42 डान्स बार व इतर आस्थापनांची तपासणी कारवाई करण्यात आली.
रेकॉर्डवरील 59 हिस्ट्रीशिटर, 50 तडीपार, 31 गुंड असे एकुण 140 सराईत गुन्हेगार यांची तपासणी करून झाडाझडती घेण्यात आली, त्यावेळी 47 तडीपार गुंड मिळून आल्याने त्यांचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे वेगवेगळया पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
अंमलीपदार्थ विरोधी कारवाईचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्या कारवाईत अंमलीपदार्थ
सेवन करणाऱ्या एकुण 15 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली. सदर ऑपरेशन दरम्यान 1 लाख 85 हजार 220 रूपये किंमतीचे अवैध शस्त्र व 5 लाख 7 हजार 484 रूपये किंमतीची
अवैध दारू असा एकुण 6 लाख 92 हजार 704 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक शाखेकडून एकुण 1210 लहान/मोठे वाहने तपासण्यात आली. दरम्यान मोटर वाहन कायदयान्वये 2149 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून एकूण 18 लाख 58 हजार 450 रूपये दंड आकारण्यात आला. Thane Police Latest Crime News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…