Thane Police News : ठाण्यात पोलिसांनी हरवलेला मोबाइल शोधून तरुणीला केला परत ; वर्तक नगर पोलिसाची यशस्वी कामगिरी

Thane Police News : वर्तकनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत 30 मार्च च्या दरम्यान रिक्षाने प्रवास करताना हरविलेला माेबाइल शाेधण्यात पाेलिसांना यश आल
ठाणे :- वर्तकनगर नाका ते दोस्ती विहार वर्तकनगर येथे रिक्षाने प्रवासाच्या दरम्यान तरुणीचा मोबाईल हरवल्याची तक्रार वर्तक नगर पोलीस ठाण्यात देण्यात vartak Nagar Police आली होती. तरुणीने 30 मार्च 2025 रोजी वर्तक नगर पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याचे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हरवलेला मोबाईल शोधून तरुणीला परत मिळवून देण्यास यश आले आहे. Thane Police Latest News
पुनम मांगीलाल चौधरी (25 वय रा. दोस्ती विहार, वर्तक नगर) या 30 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान वर्तक नाका ते दोस्ती विहार या दरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता. या संदर्भातील त्यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली होती. तरुणीच्या सांगण्यावरून तिचा आयफोन-15 हा एक लाख रुपये किंमतीचा मोबाईल फोन हरविला होता. वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण पोलीस शिपाई नानासाहेब विठ्ठल नांगरे यांनी मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण द्वारे आणि कौशल्यापूर्वक तपास करून गहाळ झालेला मोबाईल हस्तगत केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या हस्ते त्या तरुणीला मोबाईल फोन सुपूर्त केला आहे.


