मुंबई
Trending

Thane Police News : ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन पाटील यांची मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय IRONMAN 2024 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

Thane Police News : सचिन पाटील ठाणे शहर पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील नेमणूकीला आहेत. मलेशिया येथील लंकावी या शहरामध्ये World Indurance Game 2024 (IRONMAN) या स्पर्धेचे जगभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला हाेता.

ठाणे :- ठाणे शहर पोलीस Thane City Police दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलिसावलदार सचिन उर्मिला आत्माराम पाटील यांनी मलेशिया येथील लंकावी या शहरामध्ये World Indurance Game 2024 (IRONMAN) या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाटील यांनी तीन इव्हेन्ट 15 तासात उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेत सहभाग घेतला होता. Thane Police Latest News

ठाणे पोलीस दलातील हवालदार सचिन पाटील यांनी 15 तासाच्या तीन इव्हेंट मध्ये समुद्रात पोहणे : 3.8 किलोमिटर पोहणे त्यासाठी लागणारा वेळ 2 तास 20 मिनिटे,सायकलिंग : 180 किलोमिटर त्यासाठी लागणारा वेळ 8 तास 10 मिनिटे,रनिंग : 42.2 किलोमिटर त्यासाठी लागणारा वेळ 6 तास 30 मिनिटे असे उल्लेखनीय कामगिरी करत भारतासह ठाणे पोलीस पोलीस दलाचे ही नावलौकिक केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे ठाणे पोलीस दलात तसेच महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक केले जात असताना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस हवालदार सचिन पाटील यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे. Thane Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0