Thane Police News Thane Police Arrested Two Tadipar Criminal :एका आरोपीला वागळे पोलिसांनी तर दुसऱ्या आरोपीला कळवा पोलीसांनी अटक केली आहे
ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 तारीख पासून होणार आहे.पोलिसांनी यंदाचे निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे याकरिता शहरातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तडीपार आरोपींना अटक करण्याचे निर्देश ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी दिले आहे. विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून आरोपींना अटक केली आहे. Thane Crime News
आरोपी बाळा रंगनाथ साबणे, (30 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 ठाणे यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पालघर जिल्ह्याच्या हद्दीतुन 2 वर्षांच्या कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 27 ऑक्टोबर 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 कल्याण यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 17 एप्रिल रोजी दुपारी 3.20 वा. चे सुमारास, कळवा पोलीस ठाण्याच्या पथकास मिळुन आला आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी बाळा साबणे, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक साबणे हे करीत आहेत. Thane Crime News
आरोपी रोहित सुनील दळवी, (21वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 वागळे इस्टेट यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई जिल्ह्याच्या हद्दीतुन 18 महिन्याच्या कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 29 डिसेंबर 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 कल्याण यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 17 एप्रिल रोजी दुपारी 2.38वा. चे सुमारास, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पथकास कामगार हॉस्पिटल गेट समोर मिळुन आला आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, सी.आर.पी.सी.41(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी रोहित दळवी, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार महाले हे करीत आहेत. Thane Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…