क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Police News : ठाण्यात थरकाप उडवणारी कारवाई : लाल सुमितच्या टोळीवर मोक्काचा घणाघात!

ठाणे | गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण करणाऱ्या लाल सुमित या नावाला अखेर पोलिसांनी लोखंडी ताळ लावला आहे.
फक्त २२ वर्षांच्या वयात टोळी उभारून परिसरात भीतीचं साम्राज्य उभं करणाऱ्या सुमित उर्फ लाल सुनिल कदम याच्यावर आता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA)चा जबरदस्त फास आवळण्यात आला आहे. Thane latest Crime News

५ सप्टेंबरच्या पहाटे विठ्ठलवाडी परिसरात पोलिसांनी राबवलेल्या विजेच्या वेगाच्या कारवाईतून

सुमितला चक्रावून सोडत अटक करण्यात आली.
त्याच्यासोबत गुन्ह्यात हातभार लावणारी तीन विधी संघर्षित बालकेही गजाआड आहेत.
पहिल्या चौकशीतच सुमितने अनेक साथीदारांसह संगठित टोळी तयार केल्याची कबुली दिली.

भीती पसरवणारा गुन्हेगिरीचा पॅटर्न

मारहाण, खंडणी व धमकी हे टोळीचे रोजचे शस्त्र

अल्पवयीन मुलांना फसवून गुन्ह्यात ओढणे

परिसरात लाल सुमित नावाचा उच्चार जरी झाला तरी लोक गप्प बसत

पोलीसांनी त्याचा रेकॉर्ड चाळताच हे स्पष्ट झाले की
हा तरुण गुन्हेगारीच्या खोल गर्तेत उतरलेला आहे.

मोक्काचा प्रहार – आता सुटका नाही

सर्व पुरावे हातात घेतल्यानंतर पोलीसांनी
मोक्का कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) लागू करण्याची परवानगी मिळवली
आणि आरोपीवर जामिन जवळपास अशक्य असलेला कायद्याचा कठोर फास टाकला.
हीच कारवाई त्याच्या संपूर्ण टोळीवर निर्णायक ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या धडाकेबाज मोहिमेचे नेतृत्व
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त संजय जाधव,उप पोलीस आयुक्त सचिन गोरे,सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी आणि त्यांचे शूर पथक यांनी केले.प्रत्येक हालचाल गुप्त ठेवत ही कारवाई झंझावाती पद्धतीने पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0