Thane Police Latest News : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेच्या कालावधीमध्ये अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई करत तब्बल एक कोटी 25 लाखाचे चरस हे अंमली पदार्थ जप्त करून आरोपींना अटक केल्याची कामगिरी
ठाणे :- विधानसभा निवडणुका Vidhan Sabha Election दरम्यान आदर्श आचारसंहिता यामध्ये जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे यांनी मीरा-भाईंदर वसई विरार,ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारू विक्री, रोख रक्कम आणि अंमली पदार्थ खरेदी विक्री इत्यादीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या होत्या. Thane Police News आचारसंहितेच्या दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अमर मराठे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल एक कोटीहून अधिक रुपयांचा चरस हा अंमली पदार्थ जप्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या कामगिरी बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक मराठे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
28 ऑक्टोबर च्या दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अमर मराठे आणि पोलीस पथक हे मीरा-भाईंदर वसई विरार यांच्या कार्यक्षेत्रात गोल्डन नेस्ट, भाईंदर परिसरात दोन व्यक्ती मध्य प्रदेशातून तीन किलो 132 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. श त्यांच्याजवळील एक कोटी 25 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा चरस अंमली पदार्थ जप्त केला होता. याप्रकरणी एन डी पी एस कायदाअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या या कारवाईमुळे “उत्कृष्ट कारवाई” म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे यांना प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…