ठाणे

Thane Police News : ठाणे पोलिस आयुक्तालयात ‘एक खिडकी’ योजना

आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस सह आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे :- शहर पोलिस आयुक्तालयात आज 7 एप्रिलपासून ‘एक खिडकी योजना’ सुरू झाली आहे. नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देऊन सुखद धक्का दिला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर चव्हाण सह पोलीस आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

राज्य सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने कृती आराखडा तयार करून जनतेचे कामे सुलभरीत्या आणि याकरिता पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून एक खिडकी योजना चालू करण्यात आली आहे.याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच होणार असल्याचे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.शस्त्र परवाना, हॉटेल, लॉज, मिरवणूक अन्य कामांसाठी जो परवाना काढावा लागतो त्यासाठी अनेक ठिकाणी हेलपाटे घालणे, अधिकारी जागेवर नसणे यामुळे परवाना म्हणजे कटकट काम अशी मानसिकता झाली होती. आता एकाच छताखाली ही सुविधा नागरिकांना मिळेल.

पोलिस आयुक्तालयात तळमजल्यावर एक खिडकी योजना कार्यालय आहे. एक सहाय्यक निरीक्षक दर्जाचा अधिकारी कर्मचारी असा ताफा आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत कामकाज होईल. अर्ज घेण्याची वेळ सायंकाळी साडेपाचपर्यंत आहे. अर्जातील त्रुटीबाबत मार्गदर्शन, कागदपत्रे याची माहिती देणारा फलक. किती दिवसांत परवाना मिळेल याची माहिती मिळेल.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago