Thane Police News : सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस हस्तगत
Thane Police Seized Gun From Criminal : ठाणे : वर्तक नगर पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 5 गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
ठाणे :- वर्तक नगर पोलीस Thane Vartak Nagar Police ठाण्यांमध्ये एकूण 5 गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या Thane Police Station जाळ्यात सापडला. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि 1 जिवंत काडतूस असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
साहिल मंगेश हुले,( वय 24 वर्षे, रा. गणेश सेवा मित्र मंडळ, लोकमान्य नगर पाडा नं 4, ठाणे.)असे अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तकनगर पोलीस स्टेशन, ठाणे येथील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक व्हि. जे. चिंतामण यांना गुप्त बातमीदार याने माहिती दिली की, दिगंबर ठाकुर पार्किंग मैदानात, पाडा लोकमान्य नगर, ठाणे येथे एक व्यक्ती हत्यार घेवुन वावरत आहे अशी माहिती मिळाली होती.बातमीची शहानिशा करणे कामी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक व्हि. जे. चिंतामण व तपास पथकाचे स्टाफ त्या ठिकाणी पोहचले असता तेथे वर्तक नगर पोलीस स्टेशन येथील फरार आरोपी साहिल हुले असल्याचे पोलिसांचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी सायलीचे अंगझडती घेतली असता पोलिसांना एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस मिळुन आले आहे. आरोपीच्या विरोधात वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट 3,25 सह. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1),135 व 142 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन साहिल मंगेश हुले याला गुन्हयात अटक करण्यात आली आहे. साहिल वर यापूर्वी हि वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याविरोधात 5 गुन्हे दाखल आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जावळे, तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (प्रशासन) शिवराज म्हेत्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक व्हि. जे. चिंतामण, पोलीस हवालदार जाधव, महाडिक, राठोड, पोलीस नाईक पाटोळे, पोलीस शिपाई सौदागरे, नागरे यांनी केली आहे.