Thane Police News : ठाणे पोलिस दलात बदल्यांचे वारे; निरीक्षकांसह उपनिरीक्षकांचीही बदली

•राज्याच्या विविध भागात निरीक्षकांची नियुक्ती; मुंबई, रायगड व पुण्याकडे बदली
ठाणे :- राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरू झाले असून ठाणे शहर व ठाणे ग्रामीण पोलीस दलातील काही निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. राज्याचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी हे आदेश जाहीर केले.
या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस दलातील नरेश पवार आणि रविंद्र वाणी यांची बदली मुंबई पोलीस दलात करण्यात आली आहे. तर रामचंद्र मोहीते यांना रायगड जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलातील सुरेश कदम यांची बदली पुणे शहरात झाली आहे.
या बदल्यांसोबतच पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे शहरातील पोलीस उपनिरीक्षक शामराव चव्हाण यांची बदली मुंबईत झाली असून ठाणे ग्रामीणमधील संजय काशिद यांना पालघर जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.
बदल्यांचे हे सत्र पोलीस यंत्रणेत नवचैतन्य आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे, असे निरीक्षकांकडून सांगण्यात आले.


