क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Police News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; 15 गावठी कट्टा, 28 पिस्तूल जप्त, एकूण 7 लाख 5 हजार 120 मुद्देमाल जप्त

Thane Police Take Action On Illegal Daru Adda And Illegal Weapon User In Thane : ठाणे पोलीस आयुक्तांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गावठी अवैध दारूच्या हातभट्टीवर छापेमारी, 18 हातभट्ट्या उध्वस्त

ठाणे :- विधानसभा निवडणुकीच्या Thane Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होवु नये यासाठी ॲक्शन मोडवर कारवाई केली आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे, विक्री करणारे यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे,अवैध गावठी दारु निर्मिती, विक्री करणारे यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना गुन्हे शाखेचे अधिकारी यांना दिल्या होत्या. शाखेच्या पोलिसांनी एकूण 7.5 लाखांचा शस्त्रसाठा जप्त केला असून तब्बल 25 लाखहुन अधिक रुपयांचे गावठी दारू पोलिसांनी नष्ट केले आहे . Thane Police Take Action On Illegal Daru Adda

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कडून करण्यात आलेला कारवाया पुढीलप्रमाणे

1.घटक-1, ठाणे, गुन्हे शाखा यांनी राबोडी पोलीस ठाणे व शिळ डायघर पोलीस ठाणेच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी शिवमकुमार रामकिशन पपिलकुमार सत्रोहन लाल (दोन्ही रा. लखीनपुर, उत्तरप्रदेश) तसेच राहुल उर्फ काळया उर्फ मोहमद गुलजार पिर मोहमद खान (रा. शिळ-डायघर, ठाणे) याचे ताब्यातुन 5 गावठी बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत राऊंड असा 1.85 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

2.घटक-2, भिवंडी, गुन्हे शाखा यांनी भिवंडी शहर पो.स्टे. व शांतीनगर पो.स्टे.चे हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी श्रीकांत दत्ता वाघमारे (रा. नवी वस्ती, भिवंडी) व नुर मोहमद हनिफ अन्सारी, (रा. डोंगरपाडा, भिवंडी)याचे ताब्यातुन 2 गावठी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत राऊंड असा 1 लाख 70 हजार 700 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

3.घटक-5, वागळे इस्टेट, गुन्हे शाखा यांनी वागळे इस्टेट पो.स्टे.चे हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी सुमित चंद्रकांत पवार (रा. वागळेइस्टेट, ठाणे) याचे ताब्यातुन 1 गावठी बनावटीचे पिस्टल व 7 जिवंत राऊंड असा 1 लाख 12 हजार 120 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

4.घटक-३, कल्याण, गुन्हे शाखा यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी दिपक भिमाप्पा कोळी (रा. पिसवली, डोंबिवली पूर्व) याचे ताब्यातुन 3 गावठी बनावटीचे पिस्टल व 7 जिवंत राऊंड असा 75 हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

5.घटक-4, उल्हासनगर, गुन्हे शाखा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे व हिललाईन पोलीस ठाणेच्या हद्दीत
केलेल्या कारवाईमध्ये आरोपी गणेश सुरेश लोंढे, (रा. ज्योती कॉलनी, उल्हासनगर) भगवान संभाजीत यादव (रा. कात्रपपाडा, बदलापुर) याचे ताब्यातुन 2 गावठी बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत राऊंड असा 51 हजार 500 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

6.खंडणी विरोधी पथकाने राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी अब्दुल कलाम सलाम खान,( रा. कुर्ला, मुंबई) याचे ताब्यातुन 2 गावठी बनावटीचे पिस्टल व 1 जिवंत राऊंड असा 50 हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

7.मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये आरोपी अमरसिंग भगवान सिंग (रा. खारेगांव, कळवा ) याचे ताब्यातुन 1 गावठी बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत राऊंड असा 60 हजार 900 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी या संपूर्ण कारवाईमध्ये एकुण 15 गावठी बनावटीचे पिस्टल व 28 जिवंत राऊंड असा एकुण 7 लाख 5 हजार 120 रु चा मुद्देमची हस्तगत करण्यात आलेला आहे. Thane Police Take Action On Illegal Daru Adda

गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

गावठी दारु निर्मिती व विक्रीच्या संदर्भात गुन्हे शाखेचे सर्व घटकांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत एकुण 18 हातभट्ट्या उध्वस्त करुन त्यात एकुण 49 हजार 788 लिटर वॉश व गावठी दारु असा एकुण 25 लाख 30 हजार 150 रु चा माल नष्ट केला आहे. तसेच गावठी हातभट्टी दारु तसेच अवैधरित्या विदेशी दारु विक्री करण्याबाबत 131 कारवाया करुन त्यांचेकडुन एकुण 9 लाख 593 रु ची 5352 लीटर दारु पकडण्यात आलेली आहे.

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक
आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध2, गुन्हे, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 1, गुन्हे, ठाणे, धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सर्व घटक कक्षाचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0