क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Police News : नौपाड्यात ‘इंडस्ट्रियल चोरीचा बाजार’ उध्वस्त! दुकान फोडून टूल्स लंपास, विक्रीला निघालेला चोर पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे : नौपाडा परिसरात इंडस्ट्रियल साहित्य चोरी करून त्याची सर्रास विक्री करणाऱ्या चोरट्याला नौपाडा पोलिसांनी Naupada Police Stion रंगेहात पकडत गुन्हेगारी साखळीला जोरदार धक्का दिला आहे. ड्रील मशीन, ग्राइंडर, कटर, ब्लेड्स अशा तब्बल २ लाख ४३ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड करण्यात आला आहे. Thane Latest Crime News

दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी शिवप्रकाश जगरोपन राम केसरी (वय ५९) यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नौपाड्यातील मोनालिसा इमारतीतील ‘सुपर सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस’ या त्यांच्या दुकानातून महागडी पॉवर टूल्स चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

गुप्त बातमी, सापळा आणि थेट अटक!

गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. चोरीचा माल विक्रीसाठी घेऊन जाणारा आरोपी नौपाडा एलबीएस रोड परिसरात थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी क्षणात सापळा रचला.

त्याठिकाणी संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले असता त्याचे नाव
श्यामसुंदर सखाराम घाडी (वय ६२)
रा. टेंबीपाडा, भांडुप पश्चिम, मुंबई
असे निष्पन्न झाले.

बॅग उघडताच चोरीचा साठा बाहेर!

आरोपीच्या ताब्यातून
🔴 ड्रील मशीन
🔴 ग्राइंडर
🔴 कटर
🔴 ब्लेड्स
असा एकूण ₹२,४३,०००/- किंमतीचा इंडस्ट्रियल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलीस कोठडी, पुढील तपास सुरू

नौपाडा पोलीस ठाण्यात
गु. रजि. नं. ७४१/२०२५ | बीएनएस कलम ३०३(२)
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता दि. १७/१२/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चोरीचा माल आणखी कुठे विकला गेला का, याचा तपास सुरू आहे.

नौपाडा पोलिसांचा करडा वार

ही कारवाई
पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे,
सहा. पोलीस आयुक्त संभाजी जाधव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,
पोनि (गुन्हे) संजय दवणे
यांच्या मार्गदर्शनाखाली

सपोनि मंगेश भांगे व नौपाडा तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

उद्योगांच्या कष्टावर डल्ला मारणाऱ्यांना नौपाडा पोलिसांचा इशारा – चोरी केली तर सुटका नाही!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0