महाराष्ट्र
Trending

Thane Police News : ठाणे आयुक्तालयाची ऐतिहासिक कारवाई! गांजा तस्करी करणाऱ्या 17 गुन्हेगारांवर ‘मोक्का’

Thane Police Latest News : राज्याच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायदा (MCOCA) लागू

कल्याण :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची तस्करी करून राज्यातील तरुणांना व्यसनी बनवणाऱ्या 17 तस्करांवर कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात Kalyan Khadakpada Police Staion दाखल गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने ठाणे पोलीस Thane CP आयुक्तालय क्षेत्रात अंमली पदार्थांच्या तस्करांवर करण्यात आलेली ही पहिली मोठी मोक्का कारवाई आहे. Thane Police Latest News

70 लाखांचा मुद्देमाल जप्त

या टोळीचा प्रमुख गुफरान हन्नान शेख हा टिटवाळा येथील रहिवासी आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी कायद्याने दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आंध्रप्रदेश आणि सोलापूर भागातून एकूण 13 जणांना अटक केली होती.

जप्ती: पोलिसांनी या आरोपींकडून 115 किलो गांजा, गांजा तस्करीसाठी वापरलेली महागडी वाहने आणि स्वसंरक्षणासाठी बेकायदा पिस्तुल असा एकूण 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कार्यक्षेत्र: मागील तीन वर्षांपासून कार्यरत असलेली ही टोळी आंध्रप्रदेशातील दुर्गम भागातून गांजा खरेदी करून आणत होती आणि तो साखळी पद्धतीने महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे यांसारख्या विविध भागांत विकत होती. या माध्यमातून ही टोळी कोट्यवधींचा बेकायदा व्यवहार करत होती.

गुन्हेगारी पार्श्वभूमी: या टोळीतील पाच जणांवर विविध पोलीस ठाण्यांत 21 गुन्हे दाखल आहेत.

‘टोळीचा बिमोड करणे गरजेचे

या टोळीचे मूळ उखडून काढणे गरजेचे असल्याने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मोक्का लावण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त डुंबरे यांना पाठवला होता.

या कारवाईबाबत बोलताना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे म्हणाले, “ही टोळी आर्थिक स्वार्थासाठी राज्याच्या विविध भागात गांजा विक्री करून तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवत होती. या टोळीचा बिमोड करणे गरजेचे होते. वरिष्ठांच्या आदेशावरून याप्रकरणातील सतरा जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.”या गुन्ह्याचा पुढील तपास साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे करत आहेत. पोलीस आणखी चार फरार तस्करांचा शोध घेत आहेत.

मोक्का लावण्यात आलेले आरोपी

गुफरान हन्नान शेख (टिटवाळा), बाबा उस्मान शेख (आंबिवली), सुनील मोहन राठोड (बदलापूर), आझाद अब्दुल शेख (बदलापूर), रेश्मा अल्लाद्दीन शेख (अंबरनाथ), शुभम शरद भंडारी(फुरसुंगी, पुणे), असिफ शेख (मानखुर्द), सोनु हबीब शेख (मानखुर्द), प्रथमेश हरिदास नलावडे (माळशिरस, सोलापूर), अंबादास नवनाथ खामकर (सराटी, इंदापूर), आकाश बाळू भिताडे (चाकुरे, सोलापूर), योगेश दत्तात्रय जोध (जुळे सोलापूर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0