क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Police News : गुटखेबाजांचा गळा आवळला! ठाणे पोलिसांचा झंझावात — तब्बल ४६ लाखांचा ‘विषगुटखा’ जप्त, दोघे तुरुंगात!

ठाणे — महाराष्ट्रात मानवी जीवाशी खेळ करणारा ‘विषारी गुटखा’ विकणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी आता थेट गळा पकडला आहे! कासारवडवली पोलीस स्टेशनच्या Kasarwadwali Police Station पथकाने तब्बल ४५ लाख ८४ हजार ४२० रुपयांचा सुगंधित सुपारी व तंबाखूचा घातक साठा उधळून टाकत दोन गुटखेबाजांना लोखंडी कड्यांआड ढकलले. Thane Latest Crime News

महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या या गुटख्याचा साठा साई आरती बंगला, कासारवडवली गाव, घोडबंदर रोड येथील बंगल्यात करून ठेवला होता. निलेश बाबुराव चलवदे (३५) आणि सत्यभान श्रीनिवास बेहरा (३२) ही गुटखा माफियांची जोडी ‘विमल’, ‘राजनिवास’, ‘डायरेक्टर’ आणि ‘आर.जे.’ अशा ब्रँडचा विषारी माल ठाण्यात पसरवत होती. Thane Gutkha Racket Busted

पोलीसांच्या धाडीत तब्बल ४६ लाखांचा घातक गुटखा, सुगंधित सुपारी आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. आरोपींवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, दोघे आरोपी सध्या पोलीस कोठडीत गारद आहेत. Thane Latest Crime News

या कारवाईनंतर गुटखा माफियांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. ठाण्यातील प्रत्येक गल्लीबोळात भीतीचं वातावरण आहे.
“ठाणे पोलिसांनी आता गुटख्याच्या तोंडावर कुलूप ठोकलंय!”

ही धडक मोहीम पोलीस उपायुक्त प्रांत कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वात हाती घेण्यात आली.
यामध्ये सपोनि मनिष पोटे, सुनिल सुर्यवंशी, सुशिल परब, अनिल सोनावणे, संदीप तुपे यांच्या पथकाने चोख माहितीवर ही ऑपरेशन “गुटखा वादळ” राबवली.

“जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी आता खेळायला लावलं आहे. गुटखेबाजांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून पोलिसांनी दाखवून दिलं — ‘हुकूमशाही नाही, कायद्याची सत्ता!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0