क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Pune Murder News : पुण्यात गँगवॉरची दहशत, नगरसेवकाच्या खून प्रकरणातील आरोपीच्या मुलाची गोळ्या घालून हत्या

Pune Nanapeth Gang War Latest Crime News : गणेश विसर्जनाच्या तोंडावर नाना पेठेत गोळीबाराने खळबळ; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुणे :- शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, आता पुण्यातून गँगवॉरची धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune Gangwar नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. Pune Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी नाना पेठेतील गोविंद कोमकर याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात गोविंद कोमकरचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

काय आहे हे प्रकरण?

सुमारे एक वर्षापूर्वी नाना पेठेतच राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गणेश कोमकरचा हात असल्याचे समोर आले होते. आता गणेश कोमकरचा मुलगा गोविंद याची हत्या झाल्याने, ही घटना त्याच जुन्या वैमनस्यातून घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

ही घटना गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असूनही, अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0