Thane Police News: उत्तर प्रदेशातील दरोड्याच्या गुन्ह्यतील फरार आरोपीला 17 वर्षानंतर अटकेत
Thane Police Arrested Robbery Criminal: उत्तर प्रदेश फरार घोषीत केलेल्या दरोडाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना 17 वर्षानंतर खंडणी विरोधी पथक व एसटीएफ कोतवाली उत्तरप्रदेश पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे.
ठाणे :- उत्तर प्रदेश न्यायालयाने UP High Court फरार घोषीत केलेल्या दरोडाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींला सतरा वर्षानंतर खंडणी विरोधी पथक व एसटीएफ कोतवाली उत्तरप्रदेश पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे. सतिश बाबुलाल गुप्ता उर्फ सतिश तिवारी (मुळ रा.ग्राम अलमापुर थाना वारा सगवर, जिल्हा उन्नाव,राज्य उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आले आहे. Thane Police Latest News
उत्तर प्रदेश राज्यातील,भदोही, कोतवाली पोलीस ठाण्यात 2007 मध्ये आरोपी सतिश तिवारी यांच्यावर कलम 395,397 गुन्ह्यात आरोपी होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी 2007 पासून उत्तर प्रदेश राज्यातून फरार होता.उत्तरप्रदेश याचे शोधार्थ पोलीस उप निरीक्षक शहजाद खाॅं, नेमणूक एसटीएफ फिल्ड युनिट, वाराणसी,उत्तरप्रदेश व पोलीस स्टाफसह ठाणे शहर येथे आले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त, डिटेक्शन 01गुन्हे शाखा ठाणे शहर शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस, पोलीस शिपाई तानाजी पाटील, संतोष वायकर या पथकाने उत्तरप्रदेश एसटीएफचे अधिकारी यांचेसोबत केलेल्या संयुक्तीक कारवाईमध्ये फरार आरोपी सतिश बाबुलाल गुप्ता उर्फ सतिश तिवारी, याचा शोध घेतला असता आरोपी हा रोड नं. 10, वागळे इस्टेट, ठाणे शहर येथे त्याला ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी उत्तरप्रदेश एसटीएफचे पोलीस अधिकारी यांचे ताब्यात दिला आहे. Thane Police Latest News