Thane Police News : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहातील कैद्यांना बेकरी उद्योगाचे प्रशिक्षण
बेकरी प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या कैद्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम
ठाणे :- अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतून व योगेश देसाई कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांचे यांच्या संकल्पनेतून कारागृहातील कैद्यांकरिता ठाणे मध्यर्ती कारागृह, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन व ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन यांचे संयुक्त विद्यामाने “बेकरी प्रशिक्षण” सुरु करण्यात आले.मध्यवर्ती कारागृहात बेकरी कार्यरत असून बेकरीतून कैद्यांद्वारे पाव, खारी, केक, यासारखे पारंपारीक बेकरी पदार्थ तयार करण्यात येत आहेत. काळानुरुप बेकरी उत्पादनात झालेल्या बदलानुसार कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
(03 एप्रिल)आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, यांचे शुभहस्ते व राणी भोसले, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह, सुजाता सोपारकर, अध्यक्षा (TISSA), निनाद जयंवत, मानद महासचिव, (COSIA) यांचे उपस्थितीत बेकरी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच गांधी सर्वेदय मंडळ यांचेद्वारे आयोजित गांधी विचारधारेवर आधारीत” परीक्षेत उत्तीर्ण बंदी व ॲक्झोनोबेल इंडीया प्रा. कंपणी यांचेद्वारे आयोजित “डेकोरेटीव्ह वॉल पेंटींग प्रशिक्षण यशस्विरीत्या पुर्ण करणाऱ्या बंद्यांना देखील मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमा करीता डी.टी. डाबेराव, उपअधीक्षक, के. पी. भवर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी,यु.सी.पोमण, कारखाना व्यवस्थापक व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. कारागृहातील बंद्यांना कारागृहातून बाहेर गेल्यावर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, स्वतःचे व कुंटुबाचे उदर निर्वाह व्हावा या उद्देशाने जास्तीत बंद्यांना व्यावसयिक प्रशिक्षण देण्याकरीता कारागृह प्रशासनाकडून निरंतर प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून ठाणे मध्यर्ती कारागृह व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन यांचे संयुक्त विद्यामाने कारागृहातील बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असून प्राथमिक स्वरुपात बेकरी प्रशिक्षण सुरु करण्यात आले. 22 फेब्रुवारी 2024 ते 28 मार्च 2024 या कालावधीत कारागृहातील 25 बंद्यांनी प्रशिक्षणात उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन बेकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून केक, बिस्कीट, ब्रेड, बेसन नानकटाई, चॉकलेट बॉलस, चॉकलेट, मार्बल केक, अशा प्रकारचे 25 बेकरी पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
संस्थेच्या प्रशिक्षकांद्वारे यापुढे देखील कारागृहातील जास्तीत कैद्यांना व्यावसयायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून कैदी कारागृहातून बाहेर गेल्यावर या प्रशिक्षणाचा उपयोग व्हावा या उद्देशाने कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.