Thane Police News : गटारी पार्टी करून वाहन चालवणं महागात पडलं; ठाण्यात 111 मद्यधुंद चालक पोलिसांच्या जाळ्यात!

Thane Police Latest News : ठाणे वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; दारू पिऊन वाहन चालवल्यास कठोर कारवाईचा इशारा
ठाणे :- श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्येला साजरी होणारी ‘गटारी’ पार्टी अनेक वाहनचालकांना चांगलीच महागात पडली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी Thane Traffic Police मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत तब्बल 111 वाहनचालकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे केवळ स्वतःचाच नव्हे तर इतरांचा जीवही धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. Thane Police Latest News
श्रावण महिन्यात मांसाहाराला फाटा दिला जातो, त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी आषाढ अमावस्येला ‘गटारी’ साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा 23 जुलै रोजी आषाढ अमावस्येनिमित्त अनेकांनी शेतात, घरी किंवा हॉटेलमध्ये गटारी पार्टीचा आनंद घेतला. मटण, चिकन, मासे यांसारख्या मांसाहारी पदार्थांवर ताव मारला गेला. यामुळे या पदार्थांच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी, खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांवर प्रचंड गर्दी केली होती.
मांसाहारी पदार्थांसोबतच मद्याचेही सेवन गटारी पार्टीचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर एक दिवस आधीपासूनच गर्दी दिसून येत होती. मात्र, पार्टीनंतर अनेकजण मद्याच्या नशेतच वाहन चालवतात, ज्यामुळे गंभीर अपघातांचा धोका वाढतो. स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासोबतच यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येतो.
असे प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून दरवर्षी नाक्यानाक्यांवर पथके तैनात करून वाहनचालकांची मद्यपी तपासणी केली जाते. यंदाही ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, आणि बदलापूर या शहरांमध्ये मद्यपी चालकांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवली.
यासाठी शहरांतील प्रमुख नाक्यांवर पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी ‘श्वास विश्लेषक यंत्रा’द्वारे (ब्रेथ अॅनालायझर) वाहनचालकांची तपासणी केली. या विशेष मोहिमेत एकूण 111 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
कुठे किती कारवाई?
ठाणे शहर परिमंडळात: 22
वागळे परिमंडळात: 23
भिवंडी परिमंडळात: 8
कल्याण परिमंडळात: 23
उल्हासनगर परिमंडळात: 35


