Thane Police News : विकासाच्या विरोधात सभासदाकडून तक्रारी
•Thane Police News आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन ; मे.जोशी इंटरप्राईजेस व त्यांच्या भागीदारांच्या विरोधात तक्रार करण्याचे केले अहवाल
ठाणे :- शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे काम जोरात चालू आहे. एका बाजूला शहराचा विकास आणि दुसऱ्या बाजूला पुनर्वसनाच्या नावाने लोकांची फसवणूक या घटना सातत्याने समोर येत अशातच ठाणे पोलिसांनी आवाहन केले आहे की,ठाणे शहर परिसरातील जुन्या इमारतीच्या सोसायटींचे पुनर्विकास करण्यासाठी निष्कासन करुन त्याची विहित वेळेत बांधकाम पुर्ण करणे व त्यासाठी करारनामे करुन प्रत्यक्षात बाधंकाम पुर्ण न करता अर्धवट ठेवल्याबाबत तसेच त्याअनुषंगाने आर्थिक घोटाळे केले बाबत ठाणे परिसरातील विविध सोसायटीच्या सभासदाकडुन मे. जोशी इंटरप्राईजेस व त्याचे भागीदार यांचे विरुध्द तक्रारी प्राप्त आहेत. आर्थिक गुन्हे शाखेत 6 गुन्हे दाखल आहेत.
आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर या विविध तक्रारीचां आढावा घेवुन अधिक गुन्हे दाखल करण्याचे काम करीत आहे. तरी त्याबाबत आणखी तक्रारी असतील तर सोसायटी धारकांनी व वैयक्तीक गुंतवणुकदार यांनी गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे संपर्क साधावा गुन्हयाचा तपास पोलीस उप आयुक्त, पराग मणेरे आर्थिक गुन्हे शाखा ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.