Thane Police Latest News : पोलिसांच्या “रेझिंग डे” निमित्ताचे औचित्य साधत कल्याण पोलीस परिमंडळ तीनच्या वतीने ही कामगिरी बजावण्यात आली. नागरिकांनी याचे कौतुक केले आहे.
कल्याण :- महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापना चे औचित्य दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान राज्यभरातील पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.”रेझिंग डे” सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा केला जातो. Thane Police Rising Day News यानिमित्त कल्याण परिमंडळ-3 यांच्या वतीने बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई नंदन हॉल कृषी उत्पादन समिती कल्याण पश्चिम येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत CMIS ॲप चे अनावरण करण्यात आले आहे. पोलिस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लागली होती. संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान हे सर्व साहित्य संबधित फिर्यादी मूळ मालक असलेल्या नागरिकांना परत देण्यात आले. चोरीस गेलेला माल पुन्हा नागरिकांना परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.