Thane Police Latest News : पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने अवैध शस्त्रसाठा शोध मोहिमेला वेग ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा चेरपोली परिसरात यशस्वी सापळा
ठाणे :- ठाणे ग्रामीण पोलीसThane Gramin Police दलाने अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत, ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहापूर परिसरात मोठी कारवाई करत एका व्यक्तीला गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसासह अटक केली आहे. Thane Police Latest News
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यरत होते. Thane Latest Crime News
चेरपोली गावात सापळा
मंगळवारी (14 ऑक्टोबर ) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाली की, शहापूर येथील चेरपोली गाव परिसरात दिलावर शेख (वय 45) नावाचा एक इसम अवैधरित्या शस्त्र घेऊन आला आहे.
या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने तात्काळ चेरपोली गावात सापळा रचला आणि आरोपी दिलावर शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसून झडती घेतली असता, त्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतुस आढळून आले. पोलिसांनी हा संपूर्ण शस्त्रसाठा जप्त केला आहे.
आरोपी दिलावर शेख याच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट (Arms Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या अवैध शस्त्रास्त्राचा वापर कशासाठी केला जाणार होता आणि ही शस्त्रे त्याने कोठून मिळवली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…